भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची

janate nenate hotu brahmadnyani | tayanche to dhyani natudechi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
जाणते नेणते होतु ब्रह्माज्ञानी । तयांचे तो ध्यानी नातुडेची ॥१॥ सुलभ सोपारे गोकुळामाझारीं । घरोघरीं चोरी खाय लोणी ॥२॥ न कळे ब्रह्मादिकां करितां लाघव । योगियांची धांव खुटें जेथें ॥३॥ एका जनार्दनीं चेंडुवाचे मिसें । उडी घालितसे डोहामाजीं ॥४॥