भजनी मालिका
← भजनांकडे परत

जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां

janatasan jari antarinchen | tari kan ho vache vadavitan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जाणतसां जरी अंतरींचें । तरी कां हो वाचे वदवितां ॥१॥ केविलवाणे तुमचे दास । देखतां उपहास होतील ॥२॥ जग निंदय आधीं करा । मग तुम्ही धरा निज करीं ॥३॥ निळा म्हणे ऐशी रीत । नाहींचि शोभत संतांसीं ॥४॥