भजनी मालिका
← भजनांकडे परत

ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण्‍ गुरुशिष्य

ishvara niyanta nigun | nam rup jaya nahin varna | vidaya avidayatit chidadhan | apana jo apan‍ gurushishya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
ईश्वरा नियंता निगुण । नाम रुप जया नाहीं वर्ण । विदया अविदयातीत चिदधन । आपणा जो आपण्‍ गुरुशिष्य ॥१॥ नातळोनि महदहंकार मायेसी । सहजचि गुणतीत तो अनायासीं । होणें निमणें नाहीं ज्यासी । आपण आपणासी कदा न देखे ॥२॥ नुरवुनी एक एकपण । दुजेपणा घालीत शून्य । पूर्णपणें नुरवीच पूर्ण । तत्साक्षी आपण सर्वद्रष्टा ॥३॥ ऐसिया आदि गुरुमूर्ति । आपणचि पुरुष आपण शक्ति । उमामहेश ऐशिया ख्याति । वाढउनी त्रिजगती विस्तारिली ॥४॥ मग आपण गुरु आपण शिष्य । आपण दीक्षा आपण उपदेश । दाउनी परंपरेचा मोस । अभेदज्ञानास प्रगटीतु ॥५॥ म्हणोनियां जी आदिनाथा । प्रकृति पुरुष तूंचि तें आतां । सकळ विश्वी विश्वजनिता । करिसी तत्वता निजबोध ॥६॥ शिव शक्ति निमित्य दावून । उपदेशिलें निजगुह्यज्ञान । तेणें देवोदेवि सुखसंपन्न । पावला मीन तो लाभ ॥७॥ तेणें गोरक्षीं उपदेशिला । निजात्मज्ञानीं प्रबोधिला । त्रैलोक्यमाजी गौरविला । योग दाविला विषदार्थ ॥८॥ गुह्यात़गुह्यज्ञानकथन । तेणें गहिनीतें उपदेशून । उध्दरावया दीन जन । तेणें निवृति शिक्षापिला ॥९॥ तेचि हातवटी ज्ञानेश्वरा । दिधली आदिपरंपरा । सोपान मुक्ताई वटेश्वरा । चांगया प्रसाद दिधला ॥१०॥ निळा म्हणे ऐसियापरी । नाथसांप्रदायाची थोरी । प्रगट केली ज्ञानेश्वरी । भगवदगीता उकलुनी ॥११॥