भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहतां

indriye kunthit jalin | vithu mauli pahatan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
इंद्रिये कुंठित जालीं । विठु माउली पाहतां ॥१॥ वेधलें मन दुजें नेणें । विसरलें पेणें ताहानभूक ॥२॥ मदमत्सर समूळ गेला । ऐसा लागला वेध त्याचा ॥३॥ काम क्रोध पळाले दुरी । आशा तृष्णा झडकरी लपाल्या ॥४॥ मन मनाधीन जालें । एका जनार्दनीं रूप देखिलें ॥५॥