भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति

indriyanchi purali dhanv | manasi thav vishranti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
इंद्रियांची पुरली धांव । मनासी ठाव विश्रांति ॥१॥ तया नांव ब्रम्हप्राप्ती । जेथे उपरति चित्ताचीं ॥२॥ बुध्दीचीहि जाणीव विरे । तर्क मतांतरें मुरडलीं ॥३॥ निळा म्हणे कुंठित गती । पांगुळले ठाती पंचप्राण ॥४॥