भजनी मालिका
← भजनांकडे परत

इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या

indra mhane ga devadeva | na kalati amhan tujhiya mava | kalasutrin ten vishravalaghava | karisi ghadamodi svargachya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
इंद्र म्हणे गा देवदेवा । न कळती आम्हां तुझिया मावा । कळसूत्रीं तें विश्रवलाघवा । करिसी घडामोडी स्वर्गाच्या ॥१॥ निर्मिला तुवां चतुरानन । आपुलिये नाभीं देऊनि स्थान । तुझिया सत्ता माही गगन । पंचमहाभूतें वाढलीं ॥२॥ तूं या आदिचिही आदी । विश्रवीं विश्रवात्मा तूं त्रिशुध्दी । तुजवांचूनियां मना बुध्दी । कैचें बोधव्य मंतव्य ॥३॥ तुवां अंतरिक्षी धरिलें गगन । तुझिया आज्ञे विचरे पवन ॥ तु‍झिया तेजें प्रकाशे रवी । तुझिया आज्ञे विचरे पवन । तुझिया सत्ता देदीप्यमान । सर्वदा हुताशन नवेचि ॥४॥ तुझिया तेजें प्रकाशें रवी । तुझिया क्षमा अचळ पृथ्वी ॥ तुझिया द्रावें सदा टवटवी । आपांपती गंगोदकां ॥५॥ समर्थां समर्थ तूं ईश्रवर । होउनी नंदाचा कुमर । केला पवाडा हा थोर । गोवर्धन उचलिला ॥६॥ आम्हीं तुझीं म्हण्यागतें । महिमा नेणोनियां येथें । पाठविलें जे पर्जन्यातें । त्या अपराधा क्षमा कीजे ॥७॥ कोणा नेणवे तुझी लीला । देवत्रयां तूं आगळा ॥ निजानंदाचा पुतळा । सगुणरुपीया श्रीहरी ॥ निळा म्हणे ऐशी वाडमय पूजा । करुनियां कृष्णा विराटध्वजा । आज्ञा वेउनियां अमरराजा । गेला आपुलिया भुवनसी ॥९॥