भजनी मालिका
← भजनांकडे परत

इडा वाम दक्षिणे पिंगला

ida vam dakshine pingala

इडा वाम दक्षिणे पिंगला । दोहींत या कळा ब्रह्मस्थानीं ॥१॥ प्रणव सैरा बापा धांवे अवघड वाटे । रीघा नवपाटे जीव जीवना ॥२॥ ज्ञानदेव म्हणे स्वरुप जो जाणे । त्यासी शरण होणें अनन्य भावें ॥३॥