भजनी मालिका
← भजनांकडे परत

होय सौरी आतां उघडा घाली माथा

hoy sauri atan ughada ghali matha

होय सौरी आतां उघडा घाली माथा । परपुरुषीं रमल्या बाई त्याची पतिव्रता ॥१॥ कर्मेवीण सौरी झाले आले संतापाशी । ज्ञान डौर घेऊनि करीं लिंग देह नाशी ॥२॥ रांडव राहूं नका बाई पाहुनि करा वर । तेचि तुम्ही सुखी व्हाल आह्यव मरण बर ॥३॥ रांडवा ज्या ज्या मरती बाई त्यासी नाना योनी । स्वामी करुनि सूखी होई खुंटती येणीं जाणीं ॥४॥ निवृत्तीप्रसादें ज्ञानदेव बोले । स्वामी करुनी सुखी होई निजानंदीं डोले ॥५॥