भजनी मालिका
← भजनांकडे परत

हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें

henchi kalimajin sadhan | avadi kirtan harichen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
हेंचि कलीमाजीं साधन । आवडी कीर्तन हरीचें ॥१॥ न घडे योगयागतप । होय अनुताप कीर्तनीं ॥२॥ भावभक्ति लागे हातीं । प्रेम धरिती कीर्तनीं ॥३॥ आवडी धरा हरिकीर्तनीं । एका शरण जनार्दनीं ॥४॥