भजनी मालिका
← भजनांकडे परत

हे पृथ्वी तुझे लंकेसि आधारुरे रावणा

he pruthvi tujhe lankesi adharure ravana

हे पृथ्वी तुझे लंकेसि आधारुरे रावणा तें त्त्वां अपराधें बाधकेविण आणिली । नेणो किती वानर पद्यें देखतांचि रविशशी गिळिलेरया ॥१॥ विरोध न कीजे विरोध न कीजे पाडू न पाहातां मागें करिसि तें नव्हेरे रावणा । प्राणुचि पारखा जालासे गव्हारा जिणें केंवि सिध्दि जाईलरे रया ॥२॥ दों भूतांचि दशा जाणोनिरे रावणा तयाचा आगम सागरि रिघाला । तयाच्या गडे गड मेळउनी सापें डाव शिळीं बाधला ॥३॥ हनुमंत वायूचेनि मिसें तो आधींची पाईकी करी । तयाचेनि रोखें हीं रतलीं पंचभूतें उभा राहासि कास्यावरिरे रावणा ॥४॥ आकाश तेंचि अवकाश भीतरि आत्माराम आवेशला तुजवरी । तया म्हणोनि बाणजाळ घातलें वरी येरी येरें कवळी वरच्या वरीरे रावणा ॥५॥ आतां तुज देहो कैचारे रावणा आत्मा तोचि राम जालारे । बापरखुमादेविवर विठ्ठले चरेना जुंजतां तें काये केलेंरे रया ॥६॥