भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं

harichya namen hariche das jale sakalikans vanday jagin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीच्या नामें हरीचे दास जाले सकळिकांस वंदय जगीं ॥१॥ समोर त्याच्या नये काळ । कळिचा अमंगल म्हणउनी ॥२॥ वदनीं त्यांच्या निघता घोष । पळती दोष इतरांचे ॥३॥ निळा म्हणे केली वाट । सोपी वैकुंठप्राप्तीची ॥४॥