भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं

harichya bhajanen hariche bhakta hariche bhakta | jhale vikhyat bhumandalin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
हरीच्या भजनें हरीचे भक्त हरीचे भक्त । झाले विख्यात भूमंडळीं ॥१॥ तरोनि आपण तारिले आणिका । वैकुंठनायका प्रिय झाले ॥२॥ ज्यांचे ध्यानी मनीं हरी । राहिला निरंतरीं दृष्टीपुढें ॥३॥ निळा म्हणे अवघेचि सांग । केले उभय भोग भोगुनियां ॥४॥