भजनी मालिका
← भजनांकडे परत

हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी

haribhakta samudav anande krida kari

रचनाकार: संत बोधले · अभंग
हरिभक्त समुदाव आनंदे क्रीडा करी । निघाले पंढरी पहावया ॥१॥ दिंडीया पताका टाळांचे गजर । वैष्णवांचा भारू क्रीडा करी ॥ २॥ धन्ये भीमातिर गर्जते अंबर। आम्हा हरिभक्ता माहेर जोडी जाली ॥४॥ धन्य ते पंढरी अवघ्या नरनारी । उभा विटेवरी पांडुरंग ॥३॥ धन्य ते पंढरी मोक्षाची नगरी । बोधला सुखभरी आनंदरूप ॥५॥