भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुणें सकुमार सावळें दोंदील पहापा

gunen sakumar savalen dondil pahapa

गुणें सकुमार सावळें दोंदील पहापा निराळें केवी वोळलेंगे माये । सुखें चैतन्याची बुंथी वोतली ब्रह्मादिकां न कळे ज्याची थोरीव । तो हा गोवळियाच्या छंदे क्रीडतु साजणी नवल विंदान न कळें माव रया ॥१॥ डोळे बैसलें ह्रदयीं स्थिरावलें मन नुठी तेथून कांही केल्या ॥ध्रु०॥ सच्चिदानंद पदीं पदातें निर्भेदीं निजसुखाचे आनंदी माये क्रीडतुसे । तो हा डोळिया भीतरीं बाहिजु अभ्यंतरी जोडे हा उपावो किजो रया ॥२॥ गुणाचें पैं निर्गुण गंभीर सदसुखाचे उध्दार जें प्रकाशक थोर सकळ योगाचें । आनंदोनी पाहे पां साचें मनीं मनचि मुरोनि राहे तैसें बापरखुमादेविवरा विठ्ठले कीं मुसेमाजि अळंकार मुराले श्रीगुरुनिवृत्तीनें दाविलें सुखरया ॥३॥