भजनी मालिका
← भजनांकडे परत

गुजगुजीत रुप सावळे सगुण

gujagujit rup savale sagun

गुजगुजीत रुप सावळे सगुण । अनुभवितां मन वेडें होय ॥१॥ भ्रमर गुंफा ब्रह्मरंध्र तें सुरेख । पाहतां कवतुक त्रैलोकीं ॥२॥ आनंद स्वरुप प्रसिध्द देखिलें । निजरुप संचलें सर्वा ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे या सुखाची गोडी । अनुभवाची आवडी सेवीं रया ॥४॥