भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला

govali hote rakhanaint | te te mhanati jhala ghat | gai bujalya akasmat | padanapat tya jhala

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोवळी होते राखणाईंत । ते ते म्हणती झाला घात । गाई बुजल्या अकस्मात । पडणपात त्या झाला ॥१॥ मग ते आले पायवाटा । पाहाती गाई तंव सुभटा । वत्सें पान्हा घेती घटघटा । पूर लोटले क्षीराचिया सुकाळा । केले वत्सां आणि गोळियां ॥३॥ ऐसा झाला संध्याकाळ । तंव पातले गौळणींचे मेळ । सांजवाणी दुडिया घेऊनी सकळ । करित गायनें सुस्वरें ॥४॥ गौळी म्हणती पिंजल्या गाई द गोंविद म्हणे दोहा त्याही । आजि दुधाची उणेंचि नाहीं । न पुरती पात्रें तैसिचि क्षीरें ॥५॥ गोवळ आपुलालिये घरी । रात्रीं वसती सुखशेजारीं । दिवसा जाती वनांतरी । वत्सापाठी हरिसंगें ॥६॥ निळा म्हणे चतुरानन । आला गोवत्सें घेऊन । म्हणे नेण्ता महिमान । चुकी झाली क्षमा कीजे ॥७॥