भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळारे तुझें ध्यान लागो मना

gopalare tujhen dhyan lago mana

गोपाळारे तुझें ध्यान लागो मना । आनु न विसंबे हरि जगत्रजीवना ॥१॥ सोनयाचा दिवस आजि अमृतें पाहीला । नाम आठवितां रुपीं प्रगट पैं झाला ॥२॥ तनु मनु शरण विनटलों तुझ्या पाई । रखुमादेविवरा वांचूनि आनु नेणें कांहीं ॥३॥