भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं । सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा

gopal mhanati kanhaya amuchin umanin | sangasi tari charanin thenvun matha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गोपाळ म्हणती कान्हया आमुचीं उमाणीं । सांगसी तरि चरणीं ठेंवूं माथा ॥१॥ यावरीं श्रीहरि बोले मधुराक्षरीं । पुसा रे झडकरी विलंब नका ॥२॥ मीचि मज न देखें मी माझें नोळखें । कान्हो कोण्या मुखें सांगे आतां ॥३॥ तंव बोले गोविंदु ऐका रे सावधु बोधीं विराला बोधु म्हणोनियां ॥४॥ एक म्हणती गोपाळा । देखणा माझा डोळा । तरी न देखो मातें आंधळा कैसेनि झाला ॥५॥ तंव कृष्ण म्हणे दयोतक तूंची प्रकाशक । मृगजळ केंवीं अर्क देखेल सांगे ॥६॥ एक म्हणती गडी रसना रस निवडी । तरि कां ने घे गोडी आपुली आपण ॥७॥ निळा म्हणे कान्हया बोलें आमुच्या काजा । सिध्दी गेलें गुज पावलेती ॥८॥