भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक पोटींचें बाळक म्हणोनि सांगे

gonai mhane namya vachan majhen aik potinchen balak mhanoni sange

रचनाकार: संत गोणाई · अभंग
गोणाई म्हणे नाम्या वचन माझें ऐक पोटींचें बाळक म्हणोनि सांगे ।।१।। महिमेचा संसार सांडोनि आपुला संग त्वां धरिला निःसंगाचा ॥२॥ या काय मागसी तो काय देईल । शीघ्रची नेईल वैकुंठासी ।।३।। सविल्याची लॅकुरें वर्तताती कैसीं तूं मज जालासी कुलक्षय ॥४॥ धनधान्य पुत्र कलत्रें नांदती । तुज अभाग्याचे चित्तीं पांडुरंग ॥५॥ शिवण्या टिपण्या पातले पाणी न पाहासी परतोनि घराकडे ।।६।। कैसी तुझी भक्ती या लौकिकावेगळी संसाराची होळी केली नाम्या।।७।। याची तुवां कैसी धरियेली कांस हा तंव कवणास जाला नाहीं ||८|| त्यातें जे अनुसरती त्याचें नुरे कांहीं। देव नव्हे पाही हा घरघेणा ।।९।। गोकुळीं करी चोरी आफुले पोट भरी तो तुम निर्धारी देईल काई।।१०।। लक्ष्मीसारिखी सुंदर टाकोनी वाटिका गौळणी गौळीयांच्या ।।११।। अष्टसिद्धी दासी जयाच्या कामारी कल्पवृक्ष द्वारी कामधेनु ।।१२।। बळीच्याचि घरा भीक मागूं गेला । धरूनी बांधिला दारवंटा ।।१३।। कुबज्या करूप कंसाचिया दासी । जीवें भावें तिसी रतलासे ।।१४।। यातें भजती त्याच्या संसाराची नासी । जडला जीवेंसी नवजाय ।।१५।। ठकोनियां येणें बहु नाडियेलें । तैसें तुज जालें सत्य जाण ।। १६ ।। गोणाई म्हणे नाम्या बरें नाहीं केलें । घर बुडविलें कुळासहित ।।१७।।