भजनी मालिका
← भजनांकडे परत

अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें

aga ye vithoba pahe majakade | kan ga kelen veden bal majhen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
अगा ये विठोबा पाहे मजकडे । कां गा केलें वेडें बाळ माझें ।। १।। तुझें काय खादलें त्वां काय दिधलें । भलें दाखविलें देवपण||२|| आम्हीं म्हणूं तूं रे कृपालू अससी आतां तूं कळलासि पंढरिराया।।३।। कां देवपण आपुले भोगू जाणावें भक्त सुख द्यावें हेळामात्र ||४|| देव देव होऊनियां अपेश का प्यावें। माझें कां बिघडावें एकुलतें बाळ ||५|| तूं कैसारे देव या देशावेगळा बांधितें तुझा गळा परि संतां भ्यालें ॥६॥ तुझी करणी अवघी आम्हां ठाउकीच आहे। बोलोनियां काय हलकट व्हावें।।७।। जाणोनि पुंडलिक तुझी न पाहेचि वास। तूं भला नव्हेस घरघेणा।।८।। तो बैस पैं न म्हणे तुज याचकाकरणें। जडसी जीवेंप्राणें सात्विकभावें ॥९॥ झणीं तूं आपुला करिसी बोमाटा मग येईल वीट लोकाचारी ॥ १०॥ थोरपणें नामा करी मज आधीन गोणाई म्हणे चरण धरिन तुझे ।।११।।