भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें

gonai mhane namya jalpasi bhalaten | tuj konya daivaten vodhiyelen

रचनाकार: संत गोणाई · अभंग
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलतें । तुज कोण्या दैवतें वोढियेलें ।। १ ।। लाजिरवाणें तुवां केलें रे हैं जिणें । हांसती पिसुनें देशोदशीं । । २ ।। सांडीं सांडीं नाम्या तूं हें देवपिसें बळें घर कैसें बुडवितोसी ॥३॥ नवमास उदराभीतरीं वाहिला माझ्या नेणत्या बाळा चाळविलें ||४|| तुझे द्वारी बैसोनि उपवास करिन । नामा घेऊन जाईन गुणराशी ।।५।। येथें ते होईल लटिकेंचि भांडण । नामा द्यावा म्हणे गोणाई माझा ॥६॥ गोणाई म्हणे नाम्या कळेल तें करी। स्वहित विचारी सांगो किती ।।७।।