भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा

gomatenk nagar katin dharuni kar | ubha ton sukumar vaikunthincha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोमटेंक नागर कटीं धरुनि कर । उभा तों सुकुमार वैकुंठींचा ॥१॥ रूपाचें रूपस पाहतां सावकाश । धणीं धाय मनास तया पाहतां ॥२॥ नाठवे कल्पना मनाचिया मना । बुद्धि ते चरणा विनटली ॥३॥ एका जनार्दनीं इंद्रियांची चाली । सर्व हारपली पंढरी पाहतां ॥४॥