भजनी मालिका
← भजनांकडे परत

गोडी वेगळा ऊंस वाढे । हें तो न जोडे कल्पांतीं

godi vegala uns vadhe | hen to na jode kalpantin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गोडी वेगळा ऊंस वाढे । हें तो न जोडे कल्पांतीं ॥१॥ जों जों वाढे तों तों गोड । ऐशी चाड भावाची ॥२॥ जों जों धरिशील भाव । तों तों देव दिसे पुढें ॥३॥ ही तों प्रचीति घ्या अंगीं । नाचा रंगीं संतांच्या ॥४॥ रुपावेगळी ती छाया । एका जानर्दनीं लागे पायीं ॥५॥