भजनी मालिका
← भजनांकडे परत

घ्यावो सुखाचे फुकाचे

ghyavo sukhache phukache

रचनाकार: संत बोधले · अभंग
घ्यावो सुखाचे फुकाचे । नाम माझ्या विठोबाचे ॥१॥ घेता बहुत आहे सोपे । भरा आपुलाली मापे ॥ २॥ येथे दुजा नाही कोणी । घेता बहुत आहे धनी ॥३॥ न लगे हे जकाती । छाया आपुलाले हाती ॥४॥ बोधला म्हणे वर्णन केली । जनी ठेवी धरा आली ॥५॥