भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी

gharogharin chori karito hrushikesh | gar‍hane sangiti yeuni yashodesi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घरोघरीं चोरी करितो हृषीकेश । गार्‍हाणे संगिती येऊनी यशोदेसी ॥१॥ भली केली गोविंदा भली केली गोविंदा । निजभक्तालागीं दखाविसी लीला ॥२॥ कवाड उघडोनि शिंके वो तोडिलें । दहीं दुध भक्षूनि ताक उलंडिलें ॥३॥ अंतर बाहेर मज व्यापियलें माया । एका जनार्दनी म्हणे न सोडी पायां ॥४॥