भजनी मालिका
← भजनांकडे परत

घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न

gharin dhanadhanya purun | sada mage jo koranna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घरीं धनधान्य पुरून । सदा मागे जो कोरान्न ॥१॥ द्रव्य असोनी नाहीं म्हणे । केविलवाणे म्हणे मी दीन ॥२॥ असोनि द्रव्याचिया राशी । भिक्षा मागे अहर्निशीं ॥३॥ ऐसा संचय करुन । सवेंची पावल मरण ॥४॥ वायां गेला नरदेहीं । एका जनार्दनीं पाही ॥५॥