भजनी मालिका
← भजनांकडे परत

घालुनी आसन पोटीं भाव नाहीं । वायां केली पाही विटंबना

ghaluni asan potin bhav nahin | vayan keli pahi vitambana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
घालुनी आसन पोटीं भाव नाहीं । वायां केली पाही विटंबना ॥१॥ देव सर्वांभुतीं तयासी न कळे । वाउगें गवाळें पसरिलें ॥२॥ अंतरीं तो हेत द्रव्य मिळेल कांहीं । वरपांग दावी वेषधारी ॥३॥ एका जनार्दनीं ऐसीया सोंगासी । काय देवा त्यासी दंड करा ॥४॥