भजनी मालिका
← भजनांकडे परत

गावी तिचें निरंजनीं वाडेरे

gavi tichen niranjanin vadere

गावी तिचें निरंजनीं वाडेरे । तीसवें पाडेरे । तिनें दैत्य मारिले कुवाडेरे गाईचें सांगतां बहुत कुवाडेरे कान्हो ॥१॥ ते सांग पा धेनु कवण रे । तिसी नाहीं तिन्हीं गुणरे कान्हो ॥२॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलुरे । ते उभी पुंडलिकाचे द्वारीरे कान्हो ॥३॥