भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं

gaun tari ek viththalachi gaun | dhyaun tari ek viththalachi dhyaun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गाऊं तरी एक विठ्ठलाचि गाऊं । ध्याऊं तरी एक विठ्ठलचि ध्याऊं ॥१॥ पाहूं तरी एक विठ्ठलचि पाहूं । आणिकां न गोवुं वासनाही ॥२॥ आठवुं तो एक विठ्ठल आठवुं । आणिक न सांठवुं हृदयामाजीं ॥३॥ विठ्ठलावांचुनीं मनीं नाहीं आन । सर्वभावें प्रमाण विठ्ठल मज ॥४॥ एका जनार्दनीं जडला जिव्हारीं । विठ्ठल चराचरीं व्यापुनि ठेला ॥५॥