भजनी मालिका
← भजनांकडे परत

गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो

gat ten ayushya gat ten dhan | gat drushyaman padartha to

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गत तें आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥ गत अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥ एका जनार्दनीं अगत तें नाम । म्हणोनि विश्राम योगियांसी ॥३॥