भजनी मालिका
← भजनांकडे परत

गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती अधिक व्हावी

ganthin bandhoniyan dhan miraviti bhakti | manin te asakti adhik vhavi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
गांठीं बांधोनियां धन मिरविती भक्ति । मनीं ते आसक्ती अधिक व्हावी ॥१॥ चित्तवित्ता वरी भक्ति लोकाचारीं । देव अभ्यंतरी केवीं भेटी ॥२॥ असें चित्त वित्ता लावी कळांतरी । अनुष्ठान करी दिवस गणी ॥३॥ जपतप विधान अवघेंची सांडी । धरणेंची मांडी सावकाश ॥४॥ धन सांडोनी मन धरी जानार्दन । एकाएकीं भक्ती फळेल तेणें जाण ॥५॥