भजनी मालिका
← भजनांकडे परत

गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचेंचि श्रीपती । सहसा धणी न पुरे चित्तीं । सरितां रातिदिवस युगें

gailechi gatan gitin | pavade tumachenchi shripati | sahasa dhani na pure chittin | saritan ratidivas yugen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गाइलेचि गातां गीतीं । पवाडे तुमचेंचि श्रीपती । सहसा धणी न पुरे चित्तीं । सरितां रातिदिवस युगें ॥१॥ अनंता युगी अनंत खेळ । अनंता नामा रुपांचे मेळ । अनंत संपादिलें जे निर्मळ । पढतां वाचे उल्हासु ॥२॥ क्षीराब्धिशयन वैकुंठवास । अमरावती सत्यलोक कैलास । अष्टहि दिक्पाळाचे वेष । भरले सावकाश निजात्मरुपें ॥३॥ मच्छ कच्छ वराह रुपें । नृसिंह वामन परशुराम प्रतापें । राम कृष्ण बौध्यादि अमूपें । मिरविली स्वरुपें क्षुल्लकादि ॥४॥ नाना स्वर्गं सृष्टीरचना । नाना ऋषीरुपें वसवूनि स्थना । नाना संतरुपा नारायणा । निळा विज्ञापना करी तुमची ॥५॥