भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी

gaganin vasoniyan ravi | prakash bhumandala puravi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
गगनीं वसोनियां रवी । प्रकाश भूमंडला पुरवी ॥१॥ तैसे तुम्ही जेथिल तेथें । असोनियां चाळा भूतें ॥२॥ नभ न सांडुनी आपुला ठावो । पुरवी वावो जगातें ॥३॥ निळा म्हणे सन्निधानें । चुंबक चालवी अचेतनें ॥४॥