भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगनमंडळीं नारी सुकुमार दिसे

gaganamandalin nari sukumar dise

गगनमंडळीं नारी सुकुमार दिसे । तिन्ही लोक वसे तिचे उदरीं ॥१॥ परादी वाचा तन्मय ते झाली । साक्षीत्त्वासी आली ब्रह्मरंध्री ॥२॥ ज्ञानदेव म्हणे नयनांतील ज्योती । पाहातां वृत्ति हरे विषयांचीं ॥३॥