भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन डोळां भासलें तें

gagan dolan bhasalen ten

गगन डोळां भासलें तें वाहाटुळीनें कवळिलें । तेथें काहीं एक उगवलें रुप अरुप वो माये ॥१॥ पूर्ण पीठिका टाकुनी मायास्तंभ उभउनी । निजानंदी माळ घालुनी तंव तो वरिला वो माये ॥२॥ हा कामीं कामरंजनु गुणहि निर्गुण । पाहातां परिपूर्ण तरी तो सहज वो माये ॥३॥ हा पुरोनि उरला नयनीं वोसंडला । बापरखुमादेविवरा विठ्ठला तरि तो वरिला वो माये ॥४॥