भजनी मालिका
← भजनांकडे परत

गगन डोळां भासलें

gagan dolan bhasalen

गगन डोळां भासलें । तें बाहुलिनें कवळिलें । कांही एक उरलें रुप अरुपीं वो माय ॥१॥ पूर्वपिठिका सांडूनि मायास्तंभ उलंघुनी । निजानंदी माळ घालूनि म्यां वरिलें वो माये ॥२॥ तो कामिक निरंजन निर्गुण निर्गुणी । पाहातां पूर्णापूर्ण सहज वो माय ॥३॥ हा भरोनियां पुरला नयनीं वोसंडला । रखुमादेवीवरु विठ्ठला मिळाली वो माये ॥४॥