भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकि म्हणे ग्रह दुजी म्हणे मोहे

eki mhane grah duji mhane mohe

एकि म्हणे ग्रह दुजी म्हणे मोहे । एकीनें सोहं सांगीतलें ॥१॥ कोहं वाचे वारी सोहं ममतें सारी । वैकुंठीची दरी उघडली ॥२॥ ककार भेदीला मकार शोधीला । ओंकार निमाला तये स्थानीं ॥३॥ ज्ञानदेवीं ओहं सोहं गिळिलें पैं कोहं । नाहीं आम्हां मोह कल्पनेचा ॥४॥