भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकविध भावें हरी । वाचे उच्चारी सर्वदा

ekavidh bhaven hari | vache uchchari sarvada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकविध भावें हरी । वाचे उच्चारी सर्वदा ॥१॥ सर्व साधनांचे सार । विठ्ठलमंत्राचा उच्चार ॥२॥ असा सदा हेंचि ध्यान । विठ्ठलनामाचे चिंतन ॥३॥ एका जनार्दनीं जपा । विठ्ठलमंत्रसोपा ॥४॥