भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकत्त्व बाही उतरला भक्त

ekattva bahi utarala bhakta

एकत्त्व बाही उतरला भक्त । द्वैताद्वेषा विरक्त पाहोनि ठेली ॥१॥ द्वैताची काजळी क्रोधु दशा पाजळी । नाहीं ते उजळी तमदृष्टी ॥२॥ जंववरी कामना आसक्ती मोहो । तंववरी ग्रहो कल्पनेचा ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं आनंदमय हरी । द्वैताची कामारी नाईके कानीं ॥४॥