भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अबद्ध नरक जोडे

ekasi shuddha ekasi ashuddha | bolatan abaddha narak jode

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकासी शुद्ध एकासी अशुद्ध । बोलतां अबद्ध नरक जोडे ॥१॥ शुद्ध अशुद्ध हें विठोबाचें नाम । जपतां घडे सकाम मोक्ष मुक्ति ॥२॥ सकाम निष्काम देवाचेंक भजन । तेणें चुके पतन इहलोकीं ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध आणि अशुद्ध । टाकूनियां भेद भजन करी ॥४॥