भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा

ekachi stuti ekachi ninda | karitan angin adale badha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाची स्तुती एकाची निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगीं लक्ष्मी वंदावी । चरणीं गंगा ती काय निंदावी ॥२॥ ऐसा नाहीं जया विचार । भक्ति नोहे अनाचार ॥३॥ एका जनार्दनीं शरण । एकपणे जनार्दन ॥४॥