भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे

ekachi dithi ekache dole | ek chale kaisen ekachiye khole

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाचि दिठी एकाचे डोळे । एक चाले कैसें एकाचिये खोळे ॥१॥ सबाह्म अभ्यंतरीं सारिखा चांग । दोघे मिळोनियां एकचि अंग ॥२॥ यापरि रिगाले अभिन्न अंगीं । दोघे सामावाले अंगीच्या अंगीं ॥३॥ ऐसें लेकीनें बापासी बांधलें कांकण । एका जनार्दनीं केलें पाणिग्रहण ॥४॥