भजनी मालिका
← भजनांकडे परत

एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी

ekache anganin rahila parivaren | udar to na bhare du:kha kari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एकाचे अंगणीं राहिला परिवारें । उदर तो न भरे दु:ख करी ॥१॥ कांता पुत्र स्वयें क्षुधेनें मरती । होतसे फ़जिती प्रपंचाची ॥२॥ बैसोनियां कांता विचार सांगे । द्वारके लागवेगें जावें तुम्हीं ॥३॥ कृष्णाजी कृपाळु बंधु तुम्हां मानी । एका जनार्दनीं कांता बोले ॥४॥