भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं

eka velantichi adhi | murkha nenati bapudin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एका वेलांटिची आढी । मुर्ख नेणती बापुडीं ॥१॥ हरिहर शब्द वदतां । यमदुतां पडतसे चिंता ॥२॥ कीर्तनीं नाचतां अभेद । उभयतांसी परमानंद ॥३॥ एका जनार्दनीं सुख संतोष । हरिहर म्हणतां देख ॥४॥