भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका स्तुति एका निंदा । करितां अंगीं आदळे बाधा

eka stuti eka ninda | karitan angin adale badha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एका स्तुति एका निंदा । करितां अंगीं आदळे बाधा ॥१॥ अर्धांगी लक्ष्मी काय वंदावी । चरणीची गंगा निंदावी ॥२॥ भज्य करावें भजन भजनीं । निंदा स्तुति सांडोनी दोन्हीं ॥३॥ तेची भक्ति निजस्थिती । आवड चिंत्तीं भजनाची ॥४॥ वसावें सदा चरणीं मन । एका शरण जनार्दन ॥५॥