भजनी मालिका
← भजनांकडे परत

एका देहामाजीं दोघे पैं वसती । एकासी बंधन एका मुक्त गति

eka dehamajin doghe pain vasati | ekasi bandhan eka mukta gati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एका देहामाजीं दोघे पैं वसती । एकासी बंधन एका मुक्त गति ॥१॥ पहा हो समर्थ करी तैसें होय । कोण त्यासी पाहे वक्र दृष्टी ॥२॥ पापपुण्य दोन्हीं भोगवी एक हातीं । ऐशी आहे गति अतर्क्य ते ॥३॥ एका जनार्दनीं जनीं जनार्दन । तयासी नमन सर्वभावें ॥४॥