भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि

ek tin panch mela panchavisacha | chhattis tatvancha mul hari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक तीन पांच मेळा पंचविसाचा । छत्तीस तत्वांचा मुळ हरि ॥१॥ कल्पना अविद्या तेणें झाला जीव । मायोपाधि शिव बोलिजे रवी ॥२॥ जीव शिव दोनी हरिरुपी तरंग । सिंधु तो अभंग नेणें हरि ॥३॥ शक्तिवरी रजत पाहतां डोळां दिसे । रज्जुवरीं भासे मिथ्या सर्प ॥४॥ क्षेत्रक्षेत्रज्ञाते जाणताती ज्ञानीं । एका जनार्दनीं हरि बोला ॥५॥