भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतों हा सोपा

ek nishtha dhari bapa | marga sangaton ha sopa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक निष्ठा धरी बापा । मार्ग सांगतों हा सोपा ॥१॥ देहीं भाव धरी भोळा । पाहें विठ्ठल सांवळा ॥२॥ मन करितां चंचळ । देव न येचि जवळ ॥३॥ ऐसा कल्पनेचा संग । तिळभरी नको अंग ॥४॥ सच्चिदानंद निरंजन । शरण एका जनार्दन ॥५॥