भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक मागें एक पुढें । उभें रोकडें असती

ek magen ek pudhen | ubhen rokaden asati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक मागें एक पुढें । उभें रोकडें असती ॥१॥ चला जाऊं तया ठाया । पाहुं सखया आवडी ॥२॥ एक एकाचें करुनि मीस । रहिवासले सावकाश ॥३॥ बहु युगें जाहलीं पाहतां । खालीं न बैसती उभयतां ॥४॥ आनंदीं आनंद मना होय । एका जनार्दनीं पाहुनीं धाय ॥५॥