भजनी मालिका
← भजनांकडे परत

एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळें

ek don ase kariti vichar | ekachen antar eka na kalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
एक दोन असे करिती विचार । एकाचें अंतर एका न कळें ॥१॥ दोन ऐसें एक सर्वा ठायीं वसे । योगियां न दिसे एक दोन ॥२॥ जयासाठीं सर्व करिती आटाआटी । एक दोन सृष्टी भरलेसे ॥३॥ एका जनार्दनीं एक दोन वेळां । जनार्दनीं कळातीत जाणें ॥४॥